रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची  रायगड जिल्यात मदत


 

 

 नेवरूळ ग्रामविकास मंडळाला रिपाईच्या नेत्या संघमित्रा ताई गायकवाड यांच्याकडून २५ हजारांची चेक च्या स्वरूपात आणि रेशन देवून केली मदत

 

रायगड दि.२१- निसर्ग चक्रीवादळाने  कोकण सर्व  उध्वस्त झाले आहे.कोकण हे निसर्ग रम्य आहे. येथील पर्यटन व्यवसाय; शेती; बागायती ; मच्छिमारांचा व्यवसाय  गावांमधील घरे; शाळा समाजमंदिरे उध्वस्त झाली आहेत.मात्र अद्याप वादळग्रस्त कोकणाला शासनाने कोणतीही मदत दिलेली नाही. या नैसर्गिक संकटात कोकणातील रायगड जिल्ह्यातील  म्हसळा व श्रीवर्धन या सारख्या पाच सात  तालुक्यातील गावांना  तेल, तुरडाळ 1kg, मुगडाळ1,तांदूळ 5kg, पीठ5, साखर 1kg ,चहा पूड, मेणबत्ती, रवा 1 ,साबण, रिन पावडर, मिरची पावडर,हळद मसाला मीठ ,काडीपेटी, महत्त्वाचे म्हणजे मेणबत्त्याअशा जीवनश्यक वस्तूचे  वाटप टोटल 250किट तसंच 50-50किट  किट  प्रत्येकी 4 ते 5  गावात देण्यात आले नेवरूळ ग्रामविकास मंडळ म्हसळा या गावात शाळेतील पत्रे उडून गेले आहेत परंतु त्या शाळेवर पत्रे यावेत म्हणून रिपाईच्या नेत्या संघमित्रा गायकवाड यांच्याकडून २५हजारांचा चेक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कानू लटके यांच्याकडे सोपविण्यात आला त्या प्रसंगी सुनील दिवेकर नंदकुमार महाडीक सरपंच सौ.आर्या महागावकर ,उपसरपंच नामदेव महाडिक आणि माननीय नगरसेवक जयदेव रधंवे पुणे, पांडुरंग खेडेकर सचिन काते संजय लटके अनिल सावंत आणि  विजय लटके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम  करण्यात आले.आदी मान्यवर उपस्थित होते

 चक्रीवादळाने  उध्वस्त झालेल्या कोकणात अद्याप वीज सुरू नाही; त्यामुळे पाणी  नाही; दळण नाही अशी स्थिती आहे. मान्सून सुरू होत असल्याने त्वरित तुटलेली घरे उभी कारण्यासाठी शासनाने मदत द्यावी. घरावर छप्पर म्हणून पत्र्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी संघमित्राताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. 

 रीपाई च्या अश्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच उद्योजकांनी सीएसआर फंडा  मार्फत कोकणवासीयना मदत करण्यास पुढाकार घ्यावा असे  मा.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आवाहन केले आहे .

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर