आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे आणखी निराधार परप्रांतियांना आधार 


 

 

पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन परिस्थितीमुळे बिना निवारा फसलेल्या निराधार ११ परप्रांतियांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गर्शनाखाली मदतीचा आधार देण्यात आला आहे. . 


             नवीन पनवेल परिसरात ११ निराधार परप्रांतीय बिनाआधार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन पोपट यांच्या निदर्शनास आले. व त्यांनी हि बाब आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी ताबडतोब नगरसेवक संतोष शेट्टी यांच्याशी संपर्क करून त्यांना मदतीची सूचना केली. त्यानुसार नगरसेवक संतोष शेट्टी व त्यांच्यासोबत गुरुद्वाराचे सदस्य गगन सिंग आनंद, दर्शन पोपट यांनी या ११ निराधार परप्रांतीयांची योग्य प्रकारे सोय केली. 


          सध्याच्या परिस्थितीत काही गरीब आणि निराधार मजुरांना गावी जाता येत नाही. मुळचे झारखंडचे असलेले हे नागरिक पनवेल परिसरात मोलमजुरीचे काम करीत आहेत. कोरोना व लॉक डाऊनमुळे हे ११ जण निवाऱ्यापासून वंचित होते. त्यांना लॉक डाऊन झाल्यापासून गुरुद्वाराच्यावतीने नियमितपणे भोजन दिले जात होते. पाऊस व वादळ यामुळे ते कंटेनर वाहनाखाली जीव मुठीत राहून वास्तव्य करीत होते.  आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनेनुसार संतोष शेट्टी, दर्शन पोपट व गगन सिंग आनंद यांनी या ११ परप्रांतीय नागरिकांची नवीन पनवेल येथील वृंदावन आश्रमात राहण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर गुरुद्वाराद्वारे भोजन, वृंदावन आश्रमाकडून निवास व्यवस्था व अल्पोहार त्यांना पुरविण्यात येत असून मास्क, रोगप्रतिकारक अर्सेनिक अलबम ३० गोळ्या, सॅनिटायझरही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशातून देण्यात आले आहे. तसेच त्यांना त्यांच्या गावी सुरक्षित परत पाठवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मागील महिन्यात बिहार येथील ४५ निराधार परप्रांतियांनाही अशाप्रकारे मदतीचा हात देण्यात आला होता. 


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर