म्हसळा तालुक्यात 44 गावे अजूनही अंधारातच


म्हसळा / जितेंद्र नटे

          3 जून 2020 ला जी वीज गेली ती अजूनही आलीच नाही. शहर वासियांना वीज पुरवठा आणि गाववाल्यानी वाट बघा? अशी अवस्था सध्या म्हसळ्यात आहे. तातडीने समस्या सोडविणारे नेते मंडळी अजून नुकसान ग्रस्थाना मदत मिळवून देऊ शकले नाहीत? याचे सारखे दुसरे दुर्दैव नाही. सत्ताधारी आणि विरोधी आले आणि भेट देऊन गेले. सगळ्यांना वाटले भरपूर मदत मिळेल, लवकर वीज येईल. मात्र भ्रमनीरास झाला. लोक गप्प बसली आणि फसली. थंड आहेत म्हसळा वाले ते काय करणार? त्यामुळे नेते मंडळी यांना जास्त विचारत घेत नाहीत.
कुणीही वाली नाही अशी अवस्था श्रीवर्धन मतदार संघाची झाली आहे. म्हसळ्या तालुक्यातील MSEB वानखेडे अधिकारी यांच्याशी जितेंद्र नटे यांनी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितलेली परिस्थितीत भयानक आहे. 13 एजेंट ला काम दिले आहे, मात्र हे एजंट काम फास्ट करीत नाहीत. कोकणातील झाडी - झुडपे आणि डोंगर भागात काम करण्याची त्यांना सवय नाही, असे ते सांगतात. काही ठिकाणी मशीन पोचत नाहीत. तर काही एजंट काम टाकून गेले. एकूण 130 कर्मचारी काम करीत आहेत. अजून मॅनपॉवर पाहिजे आहे. अश्या अनेक समस्या आहेत. आपले कर्मचारी पावसात भिजत ही काम करीत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. पुढील 15 दिवसात पास्ती-मोरवने या विभागातील 11 गावे वीज पुरवठा सुरुवात होईल. तर वाडाम्बा, सकलप कोंड ते सांगवड या विभागातील 10 गावे 2 ते 6 दिवसात सुरु होतील. एकूण 84 गावे आहेत त्यापैकी 40 गावातील वीज सुरु झाली असून अजून 44 गावे अजूनही अंधारातच आहेत. मनुष्यबळ कमी आल्यामुळे ग्रामस्थ मंडळीची मदत घेऊन काम करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. म्हणजे स्थानिक नेते मंडळी पावसाळा सुरु असल्यामुळे अंगावर गोधडी घेऊन झोपले आहेत कि काय? नेते मंडळी आता का फिरत नाहीत मदत करायला हा राग सद्या म्हसळ्याची ग्रामीण जनता व्यक्त करीत आहेत. शहरात दुकानदाराला खुश करण्यासाठी लवकर सुरु केली वीज आणि ग्रामीण विभागाकडे दुर्लक्ष केले हे अत्यंत दुर्दैवी असून इलेक्शन येऊ द्या तर खरे मग दाखवू यांना आमची ताकद अशी घुसमट सद्या गाववाले व्यक्त करीत आहेत. 


 

Mo - 8652654519 /9137595224

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर