Joe Biden सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर बायडन देणार भारतीयांना भेट


Joe Biden सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर बायडन देणार भारतीयांना भेट


वॉशिंग्टन: पुढील वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर जो बायडन भारतीयांना भेट देणार आहेत. दस्तावेज नाहीत अशा पाच लाख भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना, आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन यासाठी आराखडा तयार करणार आहे. या निर्णयाचा फायदा भारतीयांसह एक कोटी १० लाख लोकांना होणार आहे. याव्यतिरिक्त वर्षाकाठी सुमारे ९५ हजार शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याबाबतही प्रणाली तयार करण्यात येणार आहे.


बायडन यांच्या निवडणूक अभियानाद्वारे जारी करण्यात आलेल्या धोरण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 'ते (बायडन) लवकरच अमेरिकी काँग्रेसमध्ये अनिवासी सुधारणा कायदा मंजूर करण्यावर काम करणार आहे. या अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या पाच लाखांहून अधिक भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे,' असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे
वाचा: ट्रम्प यांच्या पराभवाने मोडला गेला १२८ वर्ष जुना विक्रम!
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व देण्याबाबत कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे आता बायडन यांच्या हाती सत्ता सूत्रे आल्यानंतर बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
या अहवालानुसार बायडन हे दर वर्षी सुमारे सव्वालाख शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याचे लक्ष्य ठेवणार असून, कमीत कमी ९५ हजार शरणार्थींना देशात प्रवेश देण्यासाठी काँग्रेससोबत काम करणार आहेत. उल्लेखनीय आहे, की यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिकी फर्स्ट'ची घोषणा देऊन स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याबाबतचे नियम कडक केले होते. बायडन यांच्या या अहवालात, बायडन प्रशासन भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य बनविण्यास मदत करील; तसेच दहशतवाविरुद्धच्या लढाईत भारताला मदत करणार असून, भारत-अमेरिकेचे संबंध दृढ करण्याला प्राधान्य देणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर