देशाचे माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी पनवेल भाजपा जनसंपर्क कार्यालयात अटलजींच्या काव्यपंक्तीचे पोस्टर लावण्यात आले असून हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील चांगलेच व्हायरल आणि कौतुक होत आहे. अटलजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘अटल करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सन २०१५ पासून पनवेलमध्ये भव्यदिव्य आयोजन करण्यात येते. परंतु या वर्षी कोरोना काळात स्पर्धेचे आयोजन जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.
वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट
वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट म्हसळा (प्रतिनिधी)@रायगड मत म्हसळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे वाडांबा गाव. सामाजिक, शैक्षणिक कार्यात या गावचे म्हसळ्यात नेहमीच योगदान राहिले आहे. अत्यंत खडतर परिश्रम करणारे इथले ग्रामस्थ. याच गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव यशवंत महाडिक होय. आपल्या कुटुंबासाठी डोंबिवली येथे नोकरी करून गुजराना करणारे महादेव महाडिक यांनी आपल्या मुलीला वकील बनण्यास सांगितले. लेकीने आपल्या पित्याची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत वकिलीची "एल.एल.बी" परिक्षा उत्तीर्ण केली. वाडांबा गावाचे नाव रोशन केल्यामुळे पित्याच्या डोळ्यात आनंदाआश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. कुमारी स्नेहल महादेव महाडिक हिने अथक प्रयत्नाने व जिद्दीने एल.एल.बी परिक्षा उत्तीर्ण करून गावाचे,तालुक्याचे आणि सर्वात मोठे परिवाराचे नाव उत्कृष्ट केल्याबद्दल सर्वच स्तरावरून शुभेच्यांचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेक लोक तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देत आहेत. भविष्यात ...
Comments
Post a Comment