एक झाड माझ्या सत्यवानासाठी", जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
एक झाड माझ्या सत्यवानासाठी", जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
पनवेल : वटपौर्णिमा २४ जून रोजी असून यानिमित्ताने पनवेल मधील भगिनींसाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेपर्यंत सुरू करण्यात आलेला आहे. कोरोनाचा काळ असल्याने आणि वडाच्या झाडाची वृक्ष तोड होऊ नये यासाठी "एक झाड माझ्या सत्यवानासाठी", हा जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम राबिवण्यात येत आहे.
24 जून रोजी वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्त गृहिणी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात. परंतु सध्याचा कोरोना काळ पाहता पूजेच्या वेळी वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होण्यास मदत होईल हे टाळण्यासाठी तसेच घरामध्ये पूजन करतेवेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते. या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून पनवेलमधील भगिनींसाठी त्यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेपर्यंत सुरू करण्यात आलेला आहे. भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे. असे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यांचा हेल्पलाईन क्रमांक 9326050505 आणि 8542050505 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment