स्वार्थी राजकारणापेक्षा जनतेची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जपणे कधीही चांगले-रवींद्रशेठ नटे




स्वार्थी राजकारणापेक्षा जनतेची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जपणे कधीही चांगले-रवींद्रशेठ नटे


माजी सभापती रवींद्रशेठ नटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 


तळा संजय रिकामे


तळा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.रविंद्रशेठ नटे यांचा वाढदिवस ज्ञानदीप विद्यामंदिर उसरखुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करुन व वृद्धाश्रमात झाडे लागवड करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रवींद्रशेठ नटे यांच्या 50 व्या वाढदिवस निमित्ताने हॉटेल बगीचा इंदापूर येथे ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये सुमधुर गाणी आणि लावणी सादर करण्यात आले आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रा.जि.प.माजी सभापती हिराचंद तांबे, तळा नगरपंचायत उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रदुमन ठसाळ, भाजपा तालुका अध्यक्ष ऍड.निलेश रातवडकर,शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके, जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातू,धनराज गायकवाड, पाणी कंपनीचे मालक पांडुरंग महाडिक, पत्रकार संजय रिकामे,सरपंच शरद सारगे,उपसरपंच दिनेश गायकर, राजेश गायकर, नथुराम चोरगे, मनीष वाजे, किशोर तांबडे, मनोहर वाजे, परशुराम काते माणगाव तळा तालुक्यातील व्यापारी वर्ग, पोलीस अधिकारी प्रतीष्ठीत मंडळी आणि मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.                         

             तळा तालुक्यातील वृंदावन (भानंगकोंड) या खेडेगावात एका गरिब शेतकरयाच्या घरी जन्माला आलेले रविंद्रशेठ नटे यशस्वी उदयोजक ते तळा पंचायत समितीचे सभापती हा प्रवास थक्क करणारा असुुुन त्यांचे कष्ट आम्ही जवळुन पाहीले आहेत विविध क्षेत्रात वावरत असताना त्यांचे पाय अजुन जमिनीवरच असल्याचा दावा माजी सभापती हिराचंद तांबे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सुरवातीला रविंद्र नटे यांच्य्या सौभाग्यवती सौ.संगीता नटे त्यांचा सुपुत्र सागर नटे यांनी त्यांचे औक्षण केले.सर्वांनी दाखवलेले प्रेम आणि दिलेल्या शुभेच्छा यांचा मनापासुन स्वीकार करत असुन आलेल्या सर्वांचे नटे यांनी आभार मानले व स्वार्थी राजकारणापेक्षा जनतेची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जपणे कधीही चांगलेच असल्याचे सांगुन माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई ठाणे येथून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानले असेच प्रेम कायम राहू द्या अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर