वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक
- Get link
- X
- Other Apps
वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार वीज वितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवार दि.०८ जुलै २०२३ रोजी दुपारी ०३ वाजता खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वीज पुरवठा व त्या अनुषंगाने तक्रारी लक्षात घेता त्याचे निवारण होण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस येताना वीज ग्राहकांनी, विविध सोसाट्यांनी केलेल्या तक्रारींचा अर्ज तसेच लेखी स्वरूपात समस्या लिहून सोबत घेऊन वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment