अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल : आषाढी एकादशी निमित्त "अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन मैत्री मल्टीक्रिएशन्स यांच्यातर्फे पनवेल येथे करण्यात आले होते. यावेळी पंडित आनंद भाटे आणि गायिका केतकी माटेगावकर यांच्यासोबत सिनेअभिनेते विघ्नेश जोशी, पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्नेहकुंज आधार गृह नेरे येथील आजी-आजोबा यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते. या आजी-आजोबांच्या लेकरांनी जरी यांच्यावरील लक्ष कमी केले असले तरीसुद्धा आपण एक माणूसकी म्हणून त्यांच्या वयोमानानुसार पंढरपूरला जरी नेऊ शकत नसलो तरी सुद्धा या कार्यक्रमाची त्यांची आवड पाहता त्यांना नक्कीच काही क्षणाचा एक सुखद अनुभव देऊ शकतो या विचाराने त्यांना बोलावले होते. कार्यक्रमानंतर त्यांच्या डोळ्यातील आपुलकीचे भाव पाहून पनवेलमध्येच साक्षात विठू माऊली चे दर्शन मिळाल्याचा भास झाला असे मत माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले.
- Get link
- X
- Other Apps
.jpg)

Comments
Post a Comment