तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील न उभारलेल्या गतिरोधका विरोधात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आक्रमक




*तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील न उभारलेल्या गतिरोधका विरोधात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आक्रमक*

पनवेल (संजय कदम): तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरल गतिरोधक न उभारण्याच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमिकेबद्दल आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यानी संबधित अधिकाऱ्याची भेट घेऊन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला व येत्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी जनआंदोलनासह उपोषण करण्याच्या इशारा यावेळी दिला. 

       यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपाभियंता दिपक बोबडे पाटील यांची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, विभाग प्रमुख दत्ता फडके, उपविभाग प्रमुख विष्णू भोईर आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी भेट घेऊन तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरल गतिरोधक न उभारण्याच्या भूमिकेबाबत विचारणा केली. गतिरोधक नसल्यामुळे अपघात वाढले असून नाहक नागरिकांचा जीव जात आहे. या सर्वस्वी जबाबदार महामंडळ असल्याचे सांगितले. या विरोधात येत्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी जनआंदोलनासह उपोषण करण्याच्या इशारा सुद्धा उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी दिला. 

फोटो: शिवसेना बैठक

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर