आयटीएमचे विद्यार्थी जाणार दुबईला




आयटीएमचे विद्यार्थी जाणार दुबईला आयटीएम इन्स्टिट्यूट आणि दुबईच्या रिवोली ग्रुपचे करार लोकमत न्युज नेटवर्क पनवेल:पनवेलच्या आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या विद्यार्थ्यांना दुबई स्थित रिवोली ग्रुपच्या माध्यमातुन रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.याबाबत दि.6 रोजी दोन्ही संस्थांचा मुंबईस्थित ऑर्चिड हॉटेल मध्ये समाज्यस्य करार पार पडला.यावेळी आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स विभागाचे संचालक डॉ संकल्प राव आणि रिवोली ग्रुपचे आर जी सुंदरसन,ए पी सुबय्या उपस्थित होते. या सामंजस्य करारामुळे आयटीएम च्या विद्यार्थ्यांना ग्लोबल स्थरावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.पहिल्या टप्प्यात 5 विद्यार्थ्यांची निवड अंतिम टप्प्यात करण्यात आली आहे.थेट आंतराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी देखील आनंदात आहेत.आयटीएमचे डॉ राव यांनी देखील हि विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असुन दुबई मधील रिवोली ग्रुप नामांकित कंपनी असल्याने आमच्या संस्थेसाठी देखील हि गर्वाची बाब असल्याचे राव यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर