म्हसळयात अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गजाआड.


म्हसळयात अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गजाआड.

म्हसळा / प्रतिनिधी 

तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलगी रस्त्याने चालत जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपीने पीडितेचा हात पकडुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची घटना घडली आहे.घटनेची फिर्याद पिडीतीने म्हसळा पोलिस ठाण्यात दिली असता पोलीसांनी आरोपी माज मुजीब तालिब वय वर्षे १९ रा.वरवठणे याच्या मुस्क्या आवळून गजाआड केले .आरोपी माज मुजीब तालिब याचेवर म्हसळा पोलिस ठाण्यात कॉ.गुन्हा रजिस्टर नंबर ७२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७५ सह लैंगीक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमचे कलम ८,१२ प्रमाणे (पास्को ॲक्ट अन्वये) नोंद करण्यात आला.सदरचा गुन्हा सालविंडे रस्त्यावरील पुलावर दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता घडला असल्याचे सांगण्यात आले. आरोपी माज याचेवर अशा प्रकारचा हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून म्हसळा पोलिस ठाण्याचे स.पोलीस निरिक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी व कर्मचारी पोलिस यांनी आरोपीवर लागलीच कडक 

कारवाई केली असल्याने तालुक्यात नागरिकांकडून पोसासांचे कौतुक होत आहे. अधिक तपास श्रीमती योगिता बांडे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर