यशश्री शिंदे हत्या प्रकरणी सकल हिंदू समाज- श्रीवर्धन तर्फे आक्रोश मोर्चा.*

 





*यशश्री शिंदे हत्या प्रकरणी सकल हिंदू समाज- श्रीवर्धन तर्फे आक्रोश मोर्चा.* 


श्रीवर्धन / राजू रिकामे; 


यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करून क्रूर हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला.


उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद आज श्रीवर्धन मध्येही उमटले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशी होईल अशी कलमे लावण्यात यावीत या मागणी करिता व क्रूर निघृण हत्या करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रीवर्धनमधील सकल हिंदू समाज-श्रीवर्धन, यांच्या कडून सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सोमजाई मंदिर प्रांगण मधून टिळक रोड मार्गे शिवाजी महाराज चौक मधून वाणी आळी ते श्रीवर्धन पोलीस ठाणे पर्यंत भव्य निषेध मोर्चा आयोजीत करण्यात आला होता.


            काही दिवसांपूर्वी यशश्री शिंदे या तरुणीचा अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सध्या महाराष्टातील व जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून निषेध नोंदवत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज श्रीवर्धन तर्फे श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये श्रीवर्धन मधील समस्त जागृत हिंदू समाज व नागरिक खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर