श्रीवर्धन मतदार संघातील घराणेशाही संपुष्टात आणणार - कृष्णा कोबनाक. # विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराज सेनेचा श्रीवर्धन तालुक्यात संवाद दौरा.




#  श्रीवर्धन मतदार संघातील घराणेशाही संपुष्टात आणणार - कृष्णा कोबनाक.

# विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराज सेनेचा श्रीवर्धन तालुक्यात संवाद दौरा.

श्रीवर्धन / राजू रिकामे)

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा अभिप्राय मिळविण्यासाठी बळीराज सेना पक्षा मार्फत विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद दौऱ्यानिमित गावोगावी भेटी देत असताना श्रीवर्धन मधील आजवर सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी मतदारांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे असे वक्तव्य बळीराज सेना महाराष्ट्र प्रदेश उपाधक्ष कृष्णा कोबनाक यांनी जनसंवाद दौऱ्यानिमित श्रीवर्धन येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला.

येणाऱ्या काळात पंधरा वर्ष चाललेल्या विकास कामांच्या गप्पांना पूर्णविराम देणे गरजेचे आहे श्रीवर्धन मतदार संघात घराणेशाहीचा डंका वाजत आहे. मतदाराला मतदानाचा अधिकार दिला त्याचा योग्य वापर करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी योग्य उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे.


२२ एप्रिल २०२३ बळीराज सेनेची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. मानवता, समता, स्वातंत्र्, बंधुता व न्याय हि राष्ट्रहिताची तसेच लोककल्याण कारी विचारधारा समोर ठेऊन विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर ३९ मतदार संघात आपला उमेदवार जाहीर करणार असून श्रीवर्धन मतदार संघात अनेक वर्ष राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून कृष्णा कोबनाक हेच उमेदवार असतील असे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.




Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर