"म्हसळा शहराचे मत"? वाचा सनसनीखेज "रायगड मत" # म्हसळा शहरामध्ये स्वाभिमानी हिंदुने केले तटकरेंनाच मतदान # अनिल नवगणे दिवसभर म्हसळा येथे षड्डू ठोकून का होते? आणि मोहल्यातच का होते? तटकरेंची मते फोडली तर नाही ना? म्हसळा/जितेंद्र नटे

 


"म्हसळा शहराचे मत"? वाचा सनसनीखेज "रायगड मत"

# म्हसळा शहरामध्ये स्वाभिमानी हिंदुने केले तटकरेंनाच मतदान 

# अनिल नवगणे दिवसभर म्हसळा येथे षड्डू ठोकून का होते? आणि मोहल्यातच का होते? तटकरेंची मते फोडली तर नाही ना? 

म्हसळा/जितेंद्र नटे 

श्रीवर्धन मतदार संघांचे विजयाचे रहस्य म्हणजे म्हसळा तालुका होय. रोहा जन्मभूमी तर म्हसळा कर्मभूमी असे तटकरे भाषणात नेहमी सांगत असतात. म्हसळा शहरामध्ये एकूण 7621 मतदान आहे. त्यापैकी फक्त 4405 मतदान झाले. म्हणजे 3216 मतदारांनी मतदान केलेले नाही. म्हणजे सरासरी 57टक्के मतदान झाले. तटकरे हे मोदी यांच्यासोबत महायुतीत गेल्यामुळे हिंदू मतदारांनी त्यांना मतदान केले तर इतर समाजाने त्यांना मतदान केले नाही. हे लोकसभेच्या इलेक्शनलासुद्धा पाहिलेले होते. त्याच धर्तीवर विधानसभेला मतदारांचा कौल दिसून आला. अगोदर एकतर्फी निवडणूक होणार? असे वाटत असताना अचानक शिवसेनेचे अनिल नवगणे तुतारी वाजवत राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि रातोरात म्हसळ्याच्या राजकारणात "खळबळ" माजली. विधानसभेला 20 तारखेला शहरामध्ये 4405 मतदान झाले, शहरामध्ये 40 टक्के हिंदू मतदान आहे. आणि 60 टक्के इतर समाजाचे मतदान आहे. म्हणजे अंदाजे 2800 मते हिंदू मतदार आहेत. पैकी 2500 मते ही हिंदू मतदारांची तटकरे यांना पडली असा सर्वे रिपोर्ट सांगत आहे आणि इतर समाजाची मते 500 पकडली तर तटकरे यांना 3000 च्या आसपास मते म्हसळा शहरात मिळतील. पैकी 2500 मते ही हिंदुची असतील. मग बाकीचे मते गेली कुठे? 


कधीही न येणारे अनिल नवगणे यांनी म्हसळ्यात लक्ष केंद्रित केले होते आणि त्यामध्ये त्यांना मते फोडण्यात यशही आले. त्यांनी शरद पवार यांची सभा म्हसळा शहर येथेच विशेष मतदारांना लक्ष केंद्रित करून घेतली होती. इतर समाजाची 1 हजारच्या आसपास मते नवगणे यांना मिळतील. मात्र, मात्र स्वाभिमानी हिंदूंनी यावेळी तटकरेंच्या झोळीत भर भरून मते टाकली आहेत हे हे या म्हसळेकरांच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये आहे. तटकरे हे मोदी यांच्याजवळ गेल्यामुळे हिंदूचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे. तर मोदी यांच्याशी जवळीक झाल्यामुळे इतर समजाने मात्र त्यांना "गुलीगत धोका" तर दिलेला नाहीना? अशी चर्चा सध्या म्हसळा-दिघी नाक्यावरच्या हॉटेलमध्ये चघलळी जातआहे.


193 श्रीवर्धन मतदार संघामध्ये एकूण मतदार 2 लक्ष 65 हजार 286 पैकी 1 लक्ष 67 हजार 562 मतदारानी 61.88% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पैकी म्हसळा तालुका शहर आणि म्हसळा तालुका खेडेगावातील व मुंबईहून आलेले मतदान पकडून 20 ते 23 हजार मते अदिती तटकरे यांना मिळतील आणि इथेच त्यांना लीड मिळेल. असा अंदाज काही जेष्ठ पत्रकारांनी "रायगड मत"शी बोलताना व्यक्त केला आहे. कु. अदिती सुनिल तटकरे या पुन्हा जिंकतील असा ध्रुढ विश्वास येथील अनेक कार्यकर्त्यांनी "रायगड मत" शी बोलून दाखवला आहे. बघू या 23 तारखेला काय घडते ते? तो पर्यंत नरोवा कुन्जरोवा?




Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर