मीरा-भाईंदरमध्ये गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात.
मीरा-भाईंदरमध्ये गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात.
समाजात एकोप्यासह संस्कृतीचे दर्शन, आ. नरेंद्र मेहता यांची प्रमुख उपस्थिती.
भाईंदर, (राजू रिकामे)
मीरा-भाईंदर गवळी समाज संघटनेच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्यात समाज बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. गवळी समाजाच्या एकोपा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात लहानग्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी गाणी, नृत्य, विविध कला सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. गवळी समाजाच्या या महत्वपूर्ण सोहळ्याला मीरा-भाईंदर शहरातील आमदार नरेंद्र मेहता, शिवसेनेच्या शहर संघटक निशा नार्वेकर, १४६ विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर, १४६ विधानसभा महिला अध्यक्ष पूजा आमगावकर, भाजपा मागाठाणे विभाग प्रमुख व गवळी समाजसेवक मदन वाजे, समाजसेवक महेश म्हात्रे, उद्योजक प्रकाश खेडेकर, उद्योजक विठ्ठल दिवेकर तसेच डेक्कन बँकेचे वाईस चेअरमन दीपक सावंत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
समाजाच्या संघटनाबांधणीचे कौतुक
शिवसेनेचे सचिन मांजरेकर आणि पूजा आमागावकर यांनीही समाजाच्या संघटनाबांधणीचे कौतुक केले आणि विशेषतः महिलांनी सादरीकरण केलेल्या कार्यक्रमाचे आणि महिलांचे उपस्थिती अग्रगण्य असल्याने विशेष या बाबींचा कौतुक केले. गवळी समाजातील लहानग्यांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत, नृत्य, सादरीकरण केले. लहानग्यांनी केलेल्या या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाच्या शेवटी गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाजाच्या भविष्यासाठी अधिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनीही या पुढील काळात समाजहिताचे उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली.
एकोपा वृद्धिंगत करण्याचा संकल्प
यशस्वी आयोजनासाठी गवळी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी मोठ्या मेहनतीने योगदान दिले.
संघटनेच्या पुढील उद्दिष्टांमध्ये शैक्षणिक मदत, कौशल्य विकास, युवा सक्षमीकरण आणि समाजातील महिलांसाठी विशेष उपक्रम राबवणे यावर भर देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस गवळी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प केला.
Comments
Post a Comment