स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची कॅबीनेट मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली भेट




स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची कॅबीनेट मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली भेट

रायगड मत / प्रतिनिधी

स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची घेतली भेट. ही घटना अत्यंत वेदनादायक असून एक संवेदनशील मुलगी अन्यायाच्या सावटाखाली आयुष्य गमावते, यासारखं दुसरं दुःख नाही.

या कठीण काळात कस्पटे कुटुंबाच्या पाठिशी मी व महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीनं उभं आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, ही आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ज्या व्यक्तींनी तिच्यावर अन्याय केला, त्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होणार नाही. असे वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले.

तसेच वैष्णवीचे बाळ सुखरुप असणं गरजेचं आहे, त्यासाठी बाळाची चांगल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी घ्यावी. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे ह्या घटनेवर बारकाईने लक्ष असुन पिडीत कुटुंबियांना आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ.

या दु:खद भेटीप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, श्रीमती वैशाली नागवडे, श्री.नाना काटे, श्रीमती रुपालीताई ठोंबरे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर