जागृती फाऊंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न







 जागृती फाऊंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पनवेल/ प्रतिनिधी
 जागृती फाऊंडेशन आणि  वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन कॉप्लेक्स च्या समोरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी जागृती फाऊंडेशन विविध क्षेत्रात  करीत असलेल्या सामाजिक कामाची माहिती सांगितली .या वृक्षरोपण कार्यक्रमास गो ग्रीन नर्सरी यांचे देखील सहकार्य लाभले
जागृती फाऊंडेशन दर वर्षी पावसाळा सुरु झाला का पनवेल ग्रामीण भागासह शहरी  भागात वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करते या वर्षी देखील हा उपक्रम सुरु करीत असताना वडाळे तलाव संगीत ग्रुप यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे सांगितले त्यानुसार आज पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील नंदन वन कॉप्लेक्स च्या समोरील  आवारात वृक्षरोपण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी सुहासिनी केकाणे आणि संतोष जितेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले जागृती फाऊंडेशन करीत असलेल्या सामाजिक कामात आम्ही नेहमी जागृती फाऊंडेशन च्या सोबत असू अशी  देखील ग्वाही त्यांनी  यावेळी दिली .  या कार्यक्रमास जागृती फाऊंडेशन चे महाराष्ट्र प्रदेश युथ सेक्रेटरी अरिन सोनावणे , पनवेल तालुका युवा अध्यक्ष जश राठी, युवा सेक्रेटरी समीर शेलार ,तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,उपाध्यक्ष संदेश पाटील ,सोमटणे विभागीय अध्यक्ष मयूर गायकवाड ,वडाळे तलाव संगीत ग्रुप चे संतोष जितेकर ,चंद्रकांत मंजुळे. सुहासिनी केकाने  माजी नगरसेविका नीता माळी, सरोज जितेकर,ज्योती गुनगे,प्रमोद  म्हात्रे, राज नाईक ,डॉक्टर  कांचन मालवी. नयना मगदूम. रामदास मगदूम. निता मंजुळे,अरुण धंदर , भारती एकलरे,चारुलता सोनवणे,पल्लवी पाटील .,नंदा धंदर ,रमेश बीद. अतिश वालेलकर,मिथुन रामधरणे, नयना मलाविया,  राजेश मालावीया , जावेद भाई, अश्विनी गावडे, मिस चैतन्य आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी वडाळे तलाव संगीत ग्रुप, गो ग्रीन नर्सरी जागृती फाऊंडेशन सह उपस्तिथ मान्यवरांचे आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर