आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेचा शानदार शुभारंभ

 


आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेचा शानदार शुभारंभ 


पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ -वक्तृत्व स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी कामोठे मधील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या या उपक्रमातील वर्ग अंतर्गत फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य आणि नेतृत्वगुणांची जोपासना व्हावी या हेतूने पनवेल महानगरपालिका आणि कोशिश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा २३ जून ते ३१ जुलैपर्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे राबवली जाते. या वर्षी स्पर्धेचे तिसरे वर्ष असून १८ शाळांमधून सुमारे १४ हजार विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. स्पर्धा वर्ग अंतर्गत फेरी, शाळा अंतर्गत फेरी आणि शालेय अंतिमफेरी होणार असून निवडक ६०० स्पर्धकांमधून अंतिम६० विजेते ठरणार आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सोमवारी या स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेरीला सुरुवात झाली. यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर करत आपली मते प्रभावीपणे मांडली. मुलांचे सादरीकरण, तयारी आणि आत्मविश्वास पाहून शिक्षक, पालक आणि परीक्षक भारावून गेले. या उपक्रमामध्ये गेल्या वर्षी हजार विद्यार्थी सहभागी झाले होते, तर यावर्षी सुमारे हजार विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमात पनवेल महानगरपालिका अंतर्गत शाळांचाही समावेश आहे.  या स्पर्धेची पुढील फेरी म्हणजे शाळा अंतर्गत फेरी लवकरच घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक वर्गातील निवडक विद्यार्थी पुढे जातील. त्यानंतर अंतिम फेरीत सर्वोत्तम वक्ते निवडले जातील. यावेळी युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, समाजसेवक भाऊ भगत, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, प्राचार्य अविनाश कुलकर्णी, मनोहर शिंगाडे, विनोद खेडकर, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, कृष्ण शिरसागर, प्रवीण कोरडे, राहुल बुधे, किरण जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर