नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास कटिबद्ध - माजी सभागृहनेते परेश ठाकूर
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास कटिबद्ध - माजी सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) घोटगावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परीरातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरीकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भाजप काम करेल अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी घोट येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे युवानेते नितेश पाटील यांच्यावतीने घोट गावातील नागरीकांना मोफत छत्री आणि परिसरातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच यावेळी घोट गावाजवळ सुमारे १२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन, १२ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणाऱ्या कोयनावेळे ते आरटीओ पर्यत्ताच्या रस्त्याच्या डांबीकरणाच्या कामाचे आणि सुमारे ९ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कामांचे शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठनेते अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते झाले.
या वेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, खारघर मंडल अध्यक्ष प्रविण पाटील, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, चिटणीस आशिष कडू, नवनाथ पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, निर्दोष केणी, भाजपा नेते नितेश पाटील, हालोजी निघुकर, बाळकृष्ण पाटील, मोहन पाटील, शिवराम निघुकर, हरिभाऊ पाटील, एकनाथ पाटील, मोहन निघुकर, रमेश पाटील, दिनेश केणी, रविकांत म्हात्रे, नंदुकुमार म्हात्रे, सुरेश पोरजी, मंदार कदम, विनेश कदम, सुनील कदम, जयराम कदम, विजय कदम, गणेश निकोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment