भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सर्वांचे सौभाग्य आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल मध्ये आयोजीत करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.




भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सर्वांचे सौभाग्य आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल मध्ये आयोजीत करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.


 पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सर्वांचे सौभाग्य आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल मध्ये आयोजीत करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.

मागील ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आमुलाग्र बदल घडले आहेत. देशाने जगभरात नावलौकिक मिळवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेने जगाच्या तुलनेत महत्वपूर्ण झेप घेतली आहे. मागील ११ वर्षांतील याच सर्व कामांची माहिती नागरिकांना देण्यासाठी नवीन पनवेल येथे विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन नवीन पनवेल मधील कर्नाटक हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारने २०१४ पासून राबवलेल्या सर्व योजना तसेच प्रमुख कामगिरींबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच भाजपचे प्रवक्ते माधव गांगुर्डे यांनी मार्गदर्शन करत भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजकल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य जनतेचा विचार केला असल्याचे प्रतिपादन केले. या सभेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर सिताताई पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील,

माजी नगरसेवक संतोष शेट्टी, एकनाथ गायकवाड, अॅडव्होकेट मनोज भुजबळ, समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, सुशिला घरत, वृषाली वाघमारे,  गणेश पाटील, भिमराव पवार, ज्येष्ठनेते सि सि भगत, किशोर चौतमोल, जगदीश घरत, प्रभाग १५ अध्यक्ष शांताराम महाडीक, प्रभाग १६ अध्यक्ष शिवाजी भगत, प्रभाग १७ अध्यक्ष विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या सभेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंत्तीनिमीत्त भारतीय जनता युवा मोर्चा,नवीन पनवेल यांच्या आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम क्रमांक वेद बागवे, द्वितीय क्रमांक स्वराज काटकर आणि तृतीय क्रमांक जानवी राठोर यांनी पटकावला तर आठवी ते दहावी या गटात पहिला क्रमांक योगेश पाटील, दुसरा क्रमांक स्वरूप ठाकूर आणि तिसरा क्रमांक मुग्धा वाघमारे यांनी पटकावला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र आणि बक्षिस देऊन गौरवण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर