“योग विथ आमदार प्रशांत ठाकूर” प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनाचे खास आयोजन

 


“योग विथ आमदार प्रशांत ठाकूर”

प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनाचे खास आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने यंदाही जागतिक योग दिनाचे औचित्य साधून “योग विथ आमदार प्रशांत ठाकूर” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २१ जून रोजी सकाळी ६ वाजता पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळी होणार आहे.

         दरवर्षी प्रमाणे यंदाही योगप्रेमींना एकत्र आणून शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी हाच उपक्रम राबवला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा उपक्रम आता एक परंपरा बनला असून, आरोग्य, युवक सशक्तीकरण आणि सांस्कृतिक जतन याला वाहिलेला आहे. प्रबळगड माची, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, निसर्गाच्या सान्निध्यातील एक शांत आणि ऊर्जादायी जागा आहे. येथे योगाभ्यास करताना शरीर आणि मन दोघांनाही नवचैतन्य मिळते. ऐतिहासिक ठिकाणी योगसाधना करताना निसर्गाशी नाते जपण्याची, आणि आत्मिक शांतता अनुभवण्याची संधी मिळते. या उपक्रमात दरवर्षी शेकडो युवक, महिला, स्थानिक नागरिक, तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. विविध योगासने, श्वसन तंत्रे आणि ध्यानधारणा यांचे सत्र यावेळी योजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती आणि सहभाग आहे, जे सदैव युवा वर्गासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऑनलाईन नोंदणी फॉर्म उपलब्ध करण्यात आलेला आहे. सहभागी होण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSculcMq-BBUQhji5GuLpMrJG2uWY75XN4BkUpX671iB1enErg/viewform या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर