मैथिली पाटील कुटुंबीयांचे प्रीतम म्हात्रे यांनी केले सांत्वन
मैथिली पाटील कुटुंबीयांचे प्रीतम म्हात्रे यांनी केले सांत्वन
पनवेल : न्हावे गावातील मैथिली पाटील यांच्या दुःखद निधनानंतर भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. संकटाच्या या कठीण काळात प्रीतम म्हात्रे यांनी त्यांच्या दुःखात सहभागी होत मानसिक आधार दिला. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी संपूर्ण कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभं राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या दु:खद निधनाने न्हावा गावावर शोककळा पसरली आहे. प्रीतम म्हात्रे यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची न्हावा येथे जाऊन भेट घेतली. न्हावा गावावर पसरलेली शोककळा पाहून प्रीतम म्हात्रे यांनाही तीव्र दुःख झाले. विमान अपघाताची घडलेली ही घटना अतिशय वेदनादायक असून न्हावा गावच्या कन्येचे या दुर्दैवी अपघात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरली आहे. यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे उपस्थित होते.
Comments
Post a Comment