लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शिर्डी साईबाबा मंदिराला भेट – वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांची देणगी पनवेल (प्रतिनिधी ) माजी खासदार लोकप्रिय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदिराला भेट दिली. त्यांनी श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि समाधीस्थळी साई चरणी नमस्कार केले. तसेच समाजहितासाठी यापुढेही बळ मिळत रहावे अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते. या भेटी दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी तब्बल १० लाख रुपयांची देणगी दिली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा मोठा वारसा असून आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास यासारख्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांसाठी केले जाणारे आरोग्योपचार कार्य पाहता, त्यांनी ही देणगी देऊन समाजातील गरजू घटकांसाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. ट्रस्ट अधिकाऱ्यांच्याकडे या देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून, रायगड जिल्ह्यातील विविध उपक्रमांमधून त्यांनी आजवर हजारो लोकांचे जीवन समृद्ध केले आहे. शिर्डी दौऱ्यादरम्यान त्यांनी संस्थान ट्रस्टचे विविध प्रकल्प, रुग्णालय व अन्नछत्र सेवा यांची माहितीही घेतली आणि ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शिर्डी साईबाबा मंदिराला भेट – वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांची देणगी
पनवेल (प्रतिनिधी ) माजी खासदार लोकप्रिय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदिराला भेट दिली. त्यांनी श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि समाधीस्थळी साई चरणी नमस्कार केले. तसेच समाजहितासाठी यापुढेही बळ मिळत रहावे अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
या भेटी दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी तब्बल १० लाख रुपयांची देणगी दिली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा मोठा वारसा असून आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास यासारख्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांसाठी केले जाणारे आरोग्योपचार कार्य पाहता, त्यांनी ही देणगी देऊन समाजातील गरजू घटकांसाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. ट्रस्ट अधिकाऱ्यांच्याकडे या देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून, रायगड जिल्ह्यातील विविध उपक्रमांमधून त्यांनी आजवर हजारो लोकांचे जीवन समृद्ध केले आहे. शिर्डी दौऱ्यादरम्यान त्यांनी संस्थान ट्रस्टचे विविध प्रकल्प, रुग्णालय व अन्नछत्र सेवा यांची माहितीही घेतली आणि ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली.
Comments
Post a Comment