# खांदा कॉलनी येथे सेवा निवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम संपन्न # शेकडो नागरिकांच्या तुफान गर्दी समोर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक उच्च अधिकारी तथा सेवानिवृत्त नागरिकांचा भव्य असा जोरदार सत्कार करण्यात आला. # समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांना खांदा कॉलनी नागरिकांची पहिली पसंती

 






# खांदा कॉलनी येथे सेवा निवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम संपन्न

# शेकडो नागरिकांच्या तुफान गर्दी समोर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक उच्च अधिकारी तथा सेवानिवृत्त नागरिकांचा भव्य असा जोरदार सत्कार करण्यात आला.

# समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांना खांदा कॉलनी नागरिकांची पहिली पसंती

पनवेल : जितेंद्र नटे / रायगड मत

आज रविवार, दिनांक 13 जुलै रोजी खांदा कॉलनी येथे सेवा निवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम करण्यात आला. श्रीकृपा हॉल येथील कार्यक्रमासाठी खांदा कॉलनी वार्ड क्रमांक 15 मधील शेकडो नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शरीराचे वय झालेले पण मनाने तरुण असणाऱ्या या अश्या रिटायर्ड नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जाताना पाहायला मिळाला. आपण आयुष्यभर कष्ट करतो कोण शासकीय नोकरी करतो तर कोण प्रायव्हेट नोकरी करतो. अगदी आयुष्यभर राबराब राबतो. मात्र त्यांना अभिनंदनाचा एक शब्द पण कुणाकडून ऐकण्यास मिळत नाही. मात्र या ठिकाणी शिवाजी साहेबराव थोरवे यांनी मात्र या गोष्टीचे महत्व हेरून त्यांनी या अश्या आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी रबणाऱ्या जेष्ठ तसेच रिटायर्ड लोकांचा सत्कार करण्याचे ठरविले आणि ते करूनसुद्धा दाखविले. याठिकाणी पोलीस, मिलिटरी, शिक्षक, तसेच अनेक प्रायव्हेट रिटायर्ड अधिकारी पाहायला मिळाले. अनेक लोकांना विचारले असता आम्हाला असा आनंद देणारा समाजसेवक आम्ही आधी कधी पहिला नाही असे आशीर्वाद पर शब्दात काही लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. असा व्यक्ती नगरसेवक व्हावा अश्या शुभेच्छा ही दिल्या. 


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे रामदास शेवाळे यांनी थोरवे यांचे थोर कार्य अशा शब्दात स्तुती सुमने उधळली. भगवा साप्ताहाच्या माध्यमातून त्यांनी 30 दिवस 30 कार्यक्रम हा उपक्रम राबवत जी काही लोकांची सेवा चालू ठेवली आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 


डोमेसाइल, उत्पनाचा दाखला, तसेच नॉन क्रिमीलेअर, तसेच इतर लोकांना लागणारे कुणाचे राशन कार्ड, जेष्ठ नागरिक, मतदार ओळखपत्र, कृषी कार्ड, पेन्शन फॉर्म, आभा कार्ड, आयुष्यमान हेल्थ कार्ड, ईश्रम कार्ड, पॅनकार्ड किंवा कुणाचे लायसन्स अगदी पैसे न घेता मोफत पद्धतीने ते करून देत आहेत. अनेक शासकीय योजना, जेष्ठ नागरिक कार्ड, शासकीय दाखले, तसेच अनेक लायसन्स, आयुष्मान कार्ड या सारख्या माणसांना गरजेच्या ज्या गोष्टी असतात जे कार्ड असतात ते त्यांनी मोफत काढून देण्याचे कार्य चालूच ठेवलेले आहे. तसेच आज आर्मी ऑफिसर, पोलीस अधिकारी, शासकीय निम शासकीय अधिकारी तसेच इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा जंगी सेवानिवृत्त सत्कार समारंभ आयोजित केले आहे त्याचे मी अप्रतिम कार्यक्रम म्हणून अभिनंदन करतो. असेच खांदा कॉलनितील लोकांची सेवा करत रहा. नक्कीच लोक तुमच्यापाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गोरगरीब जनतेसाठी राबनारी संघटना अशी धोरण असणारी शिवसेना ही संघटना आहे. मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवत आहात हे थोरवे तुमचे फार मोठे वैशिष्टे आहे. आपली शिवसेना ही राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणारी संघटना आहे. लोकांच्या अडी-अडचणींना धावून जातो तोच मोठा होतो आणि लोक त्याला निवडून देतात. यावेळी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा अनुभव संगितला. रामदास शेवाळे आपले मन व्यक्त करताना पुढे सांगू लागले, "मी एकं साधारण क्लीनर होतो. पुढे मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आपल्या समोर उभा आहे. बाकी जास्त काही सांगत नाही कारण ते सर्व तुम्हाला माहित आहे. आज राजकारणात आणि उद्योग धंद्यात कुठे पोहोचलो आहे हे आपण पाहत आहात. कारण मी लोकांच्या अडी अडचणी सोडविल्या. अगदी कोरोना काळात गावी गेलो नाही इथेच पनवेल मधील नागरिकांची सेवा केली. ट्रक च्या ट्रक भरून धान्य पुरविले मला वाटत त्याचेच हे फलित आहे. 


यानंतर गेली अनेक वर्षे खांदा कॉलोनी येथील रहिवाशी असणारे आणि येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जाणारे समाजसेवक अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी नगरसेवक खांदा कॉलनी विभागात लोकप्रिय असलेले शिवाजी साहेबराव थोरात यांनी सुद्धा लोकांशी संवाद साधला. आपल्या भाषणात माझे अहोभाग्य आहे, "की मी या रिटायर्ड सेवानिवृत्त लोकांचा सत्कार कार्यक्रम करतोय. जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून अनेकांना मी मदत करत आलोले आहे आणि पुढेही करत राहीन. मी पनवेल तहसील जवळच ऑफिस टाकून बसलेलो आहे. काही लोक तुमच्याकडून पैसे घेऊन काम करत असतील मी मात्र माज्या विभागातील लोकांना मोफत काम करून देणार आहे. आपले कुठलेली शासकीय दाखले जसे की राशन कार्ड, जेष्ठ नागरिक, मतदार ओळखपत्र, कृषी कार्ड, पेन्शन फॉर्म, आभा कार्ड, आयुष्यमान हेल्थ कार्ड, ईश्रम कार्ड, पॅनकार्ड किंवा कुणाचे लायसन्स अगदी पैसे न घेता मोफत पद्धतीने ते करून देत आहेत. अनेक शासकीय योजना, जेष्ठ नागरिक कार्ड, शासकीय दाखले, तसेच अनेक लायसन्स, आयुष्मान कार्ड या सारख्या माणसांना गरजेच्या ज्या गोष्टी असतात त्या मी माज्यातर्फे मोफत देणार आहे. आज भगवा साप्ताहाच्या माध्यमातून अनेक लोकांचा सत्कार करून मनाला खूप धन्य झाल्यासारखे वाटले. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद अशा शब्दात त्यांनी लोकांचे आभारही मानले. मी खांदा कॉलनी वार्ड क्रमांक 15 मध्ये आहेच आपण कधीही या खांदा कॉलनी वासियांसाठी रात्री सुद्धा उपलब्ध असेन असे बोलून त्यांनी रजा घेतली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन मोकल यांनी केले. 










Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर