म्हसळा नगरसेविका सरोज म्हशिलकर यांच्या कार्याचा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संस्थानने केला सन्मान
म्हसळा नगरसेविका सरोज म्हशिलकर यांच्या कार्याचा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संस्थानने केला सन्मान
म्हसळा - (रायगड)- म्हसळा नगर पंचायत नगरसेविका श्री स्वामी समर्थ भक्त सरोज मंगेश म्हशिलकर यांचे अक्कलकोट येथे पार पडलेल्या ३८ व्या गुरुपौर्णिमा धर्मसंकीर्तन व वर्धापन दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष सोहळ्यात श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अलकाताई भोसले,जनमेजय राजे विजयसिंह राजे भोसले आणि अमोल राजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, सभापती संकेत पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. म्हसळा नगरसेविका सरोज म्हशिलकर या उत्तम गायिका आहेत त्यांनी सन २००१ मध्ये गायन केलेली "समर्थवाणी" ही कॅसेट अन्नछत्र मंडळाच्या सेवेसाठी अर्पण केली होती. ३० डिसेंबर २००३ मध्ये सरोज म्हशिलकर आणि पती मंगेश म्हशिलकर यांनी म्हसळा येथे स्वखर्चाने श्री स्वामी समर्थ धाम उभारून ते हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या सेवेस अर्पण केले आहे.
त्यांच्या या निःस्वार्थ योगदानाची श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संस्थानने दखल घेऊन गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी हजारो श्री स्वामी समर्थ भक्तगणाचे साक्षीने मान्यवरांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्यात गायन सम्राट संदिप पाटील यांनी दिग्दर्शशीत केलेला "रजनी गंधा"मराठी गीतांचा सदाबहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment