म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव याच्या मध्यभागी एम.आय.डी.सी. आणावी अशी आम्ही ४ तालुक्यांच्या वतीने नम्र विनंती करीत मागणी करीत आहाेत. - श्री. जितेंद्र नटे



 प्रति,

मा. श्री. उदयजी सामंत साहेब
उद्याेग मंत्री, महाराष्ट्र राज्य,  मंत्रालय,
मादाम कामा राेड, मुंबई - 400032


विषय : म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव याच्या मध्यभागी एम.आय.डी.सी. आणावी अशी आम्ही ४ तालुक्यांच्या वतीने नम्र विनंती करीत मागणी करीत आहाेत. 


महाेदय, साहेब नमस्कार!


गेली अनेक वर्षे आपण महाराष्ट्रात उद्याेग मंत्री म्हणून काम करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन! आपल्या कामासाठी आपण झाेकून देत अनेक नव-नवीन उपक्रम घेऊन येत आहात, त्याबद्दल आपले सबंध बेराेजगार तरुणांच्यातर्फे आपले आभार! मात्र आपण चांगले काम करीत असतांना ग्रामीण विभाग म्हणजे काेकणातील ओस पडत चाललेली गावे का ओस पडत आहेत. कृपया याकडे लक्ष वेधावे म्हणून मी हा पत्रप्रपंच करीत आहे.


साहेब! आपणास ठाऊक असेलच आपण निरीक्षण केले असेल तर आपणास पहावयास मिळेल की, गेली कित्येक वर्षे काेकणी माणूस हा मुंबईवर अवलंबून आहे. कारण काय? तर, गावी कामधंदा नाही? नाेकरी नाही? त्यामुळे स्थलांतर थांबू शकलेले नाही. स्थालंकर का थांबत नाही? कारण गावी नाेकरी नाही? गावी नाेकरी का नाही? कारण गावी कंपन्या नाहीत? गावी कंपन्या का नाहीत? कारण तेथे एम.आय.डी.सी. नाही?


म्हणजे प्रत्येक तालुक्यात किंवा ४ तालुक्याच्या मध्यभागी जर एखादी ५०-१०० कंपन्या बसतील अशी एम.आय.डी.सी. झाली तर नक्कीच लाेक गावी राहतील. त्यामुळे ओस पडलेली घरे पुन्हा चालू हाेतील. तेथील लाेक आपल्या मुलांना तेथीलच मराठी शाळेेत टाकतील. त्यामुळे मराठी शाळा सुध्दा ज्या बंद पडत आहेत त्यासुध्दा चालू राहतील आणि हे सर्व एका एम.आय.डी.सी. वर अवलंबून आहे. एका एम.आय.डी.सी. वर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५ ते १० हजार लाेकांचे पाेट भरले जाते. प्रत्येक कंपनीत लागणारे ५० ते १०० कर्मचारी, तसेच एम.आय.डी.सी. आली की ट्रान्सपाेर्ट आलेच. त्यांनाही राेजगार मिळताे. लेबर वर्क, बाजूला हाॅटेल, ढाबे, साफ सफाई तसेच पर्यटन सुध्दा वाढेल. इतर उद्याेग धंदे सुद्धा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष राेजगार देऊन जातात. त्यामुळे आपण या महत्वाचा प्रश्नाकडे जर लक्ष वेधलेत आणि आता सुरुवात केलीत तर कदाचीत पुढील १० वर्षातील स्थलांतराचा प्रश्न मिटेल. लाेक मुंबईला कंटाळली आहेत. भले कमी पगार असेल तरी चालेल पण गावीच काम भेटले तर बरे हाेईल अशा भावना व्यक्त करीत आहेत. कारण मुंबईत स्वत:ची रुम घेणे आता शक्यच नाही. मुंबईत भाडे, शिक्षण आणि  इतर गाेष्टी खूप महाग झाल्या आहेत. महागाईला लाेक कंटाळली आहेत.


रायगड जिल्यात इतर ठीकाणी एम.आय.डी.सी. आल्या त्या तालुक्याचा विकास झाला मात्र - माझा म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव मात्र मागेच राहिला. इथे ९० टक्के घरे बंद आहेत. कारण गावी कामधंदा नाही? तरी आपण लक्ष देऊन एम.आय.डी.सी. कशी येईल आणि  स्थलांतर कसे थांबेल याकडे लक्ष वेधावे. विळे भागाड माणगांव मध्ये पाॅस्काे कंपनी आहे मात्र तेथे स्थानिकांना नाेक-या कुठे आहेत. तसेच दिघी पाेर्ट कंपनी २५ वर्षे झाली आली आहे. मात्र ती पुर्णपणे चालू नाही. नुसत्या बाेलाचेच भात आणि बाेलाचीच कडी. नाेकऱ्या कुठे देत नाहीत या कंपन्यामध्ये? श्रीवर्धनमध्ये, दिवेआगरमध्ये, थाेडा पर्यटन व्यवसाय आहे. पण ते काही ठरावीक लाेकांना राेजगार मिळत आहे. ते पण शनिवार - रविवार फक्त. माणगांव मध्ये बाहेरचे लाेक येऊन व्यवसाय करीत आहेत. कारण त्यांच्याकडे पैसा आहे. श्रीवर्धनमध्ये थाेडा पर्यटन आहे. मात्र म्हसळा आणि तळा तालुक्यातील गावे तर ९९ टक्के ओस पडली आहेत. आपण एखादा दाैरा करा आणि काय दुरावस्था आहे, याची प्रत्यक्ष माहिती घ्या. या ४ तालुक्यातील अनेक लाेक डायमंडमध्ये कामाला आहेत. असाच एखादा माेठा कारखाना या तालुक्यात सुरु झाला तर अनेक लाेकांना राेजगार मिळेल. तरी म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव याच्या मध्यभागी कुठलाही नैसर्गिक नुकसान न करता १०० कंपन्या बसतील अशी एम.आय.डी.सी. आणावी अशी मी ४ तालुक्यांच्या वतीने नम्र विनंती करीत मागणी करीत आहे. मी मिडियामध्ये २५ वर्षे काम करीत आहे. अनेक कंपन्या माझ्या परीचयाच्या आहेत आणि त्या कंपनी उभी करण्यासाठी इच्छुक आहेत मात्र, जागा, पाणी, वीज ही एम.आय.डी.सी.च देऊ शकते म्हणून प्राेजेक्ट टाकू शकत नाहीत. तरी एम.आय.डी.सी.चा विचार करावा आणि लवकरात लवकर अमलात आणावा ही सबंध ४ तालुक्याच्या वतीने या मागणी पत्राद्वारे नम्र विनंती करीत आहोत.


धन्यवाद !

आपला विश्वासू,

श्री. जितेंद्र नटे

# अध्यक्ष - ४ तालुका विकास संघटना
  (म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव)

# संपादक - रायगड मत वर्तमान पत्र

Mo. - 8652654519

Email : jitendranate@gmail.com

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर