विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवावी -शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ

 



विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवावी -शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ


पनवेल (प्रतिनिधी) शिक्षणामुळे खूप काही शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपली गुणवत्ता टिकवून ठेवावी व सर्जनशीलता विकसित करावी, असे मार्गदर्शन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ यांनी केले. ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या 23व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ यांनी मनोगतात, परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षण हे महत्त्वाचे साधन नाही. आज मी शिक्षण उपसंचालक म्हणून जे पद भूषवित आहेत ते केवळ शिक्षणामुळेच शक्य झाले आहे, असे नमूद केले. संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे रोलमॉडेल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याविषयी त्यांनी या वेळी गौरवोद्गार काढले. रयत शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपयांची देणगी देणारे दानशूर व्यक्तिमत्व अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले.

संस्थेचे चेअरमन, लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शाळा ही आयुष्य घडविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र असते. विद्यार्थ्यांना घडवून भावी सुजाण नागरिक बनविण्याच्या दृष्टीने शाळेची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हा सर्वांना मोलाचे आयुष्य मिळाले आहे. चांगले शिक्षण घेऊन नावलौकिक मिळवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासामुळे भारताला आज जगात चौथ्या क्रमांकाचे स्थान आहे. आपला देश विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय. अशा वेळी आपल्या शाळेला 31 वर्षे झाली आहेत. शाळा आपणांस पिढ्यानपिढ्या शिक्षण देते. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, आज पनवेल परिसरात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रकल्प येत आहेत. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले करिअर घडविणे गरजेचे आहे. सीकेटी शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जातेे. विद्यार्थ्यांसाठी ही शाळा नेहमी पाठीशी उभी असणार आहे.

व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, जेबीएसपी ही संस्था गेली 31 वर्ष असे विद्यार्थ्यांचा गुणगौरव साजरे करत आहे. आज संस्थेत केजीपासून पीएचडीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. आजच्या पिढीला सर्व शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळेच संस्थेचा आलेख सतत उंचावत चाललेला आहे.

उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे यांनी प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी संस्थेने गेल्या 31 वर्षात केलेला प्रगतीचा आलेख सादर केला. सातत्याने प्रगतीपूर्ण यशस्वी वाटचाल करून आज संस्थेचे नाव साता समुद्रापलीकडे गेले आहे. विद्यार्थ्यांनी अपयश आल्यास खचून न जाता त्याला धाडसाने तोंड दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, सुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राहुल घरत व स्वप्नील ठाकूर, रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेज खारघरच्या प्राचार्य निशा नायर, सीकेटी विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापक कैलास सत्रे, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभाग प्राचार्य प्रशांत मोरे, प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापक सुभाष मानकर, प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, अजित सोनवणे, स्वाती पाटील, नीरजा अधुरी, वैशाली पारधी यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनानंतर संगीत शिक्षक रूपेश मढवी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर