4 तालुका विकास संघटनेची प्रथम सभा म्हणजे नवीन विचाराची नवीन सुरुवात....
4 तालुका विकास संघटनेची प्रथम सभा म्हणजे नवीन विचाराची नवीन सुरुवात....
रायगड मत / प्रतिनिधी
दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी आज पहिली सभा झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे आणि ट्रेन प्रॉब्लेम मुळे अनेक लोक पोहचू शकली नाहीत. मात्र जे लोक आली होती त्यांनी मात्र आपले मनोगत व्यक्त करून आणि अनेक सुचनापर मार्गदर्शन करून सभेस वेगळाच रंग भरला.. येणाऱ्या काळात संघटनेने घेतलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत, हे त्यांना पटले आहेत. माणगांव लोकल ट्रेन सुरु झाल्यास त्याचा म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव या तालुक्यावर थेट कसा परिणाम होईल. याचे मार्गदर्शन अध्यक्ष जितेंद्र नटे यांनी थोडक्यात केले. आमदार अदिती तटकरे यांना पत्र, तसेच रेल्वे मंत्रालय यांना दिलेले पत्र आणि MIDC संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेले पत्र याची माहिती दिली. MIDC मुळे रोजगारं मिळेल आणि स्थलानंतर थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वे कनेक्टीविटी फार महत्वाची असून येणाऱ्या काळात लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी वेळ पडल्यास रेल्वे मंत्र्यांना जाब विचारू. रोहा पर्यंत सेंट्रल रेल्वे आहे. पुढे माणगांव फक्त 2 स्टेशनं आहेत. मग माणगाव सेंटर असताना ते सेंट्रल रेल्वेत का नाहीत? ते जर अगोदरच विचार केला गेला असता तर. तर पनवेल - माणगांव लोकल ट्रेन कधीच सुरु झाली असती असा संताप त्यांनी व्यक्त केला. मेमू ट्रेन माणगांव पर्यंत नेता आली असती. सकाळच्या 2 ट्रेन जायला आणि 2 ट्रेन यायला जरी सुरु केल्या तरी 4 तालुक्यातील लोकांना त्याचा खूप फायदा झाला असता. असे अनेक मुद्दे त्यांनी पटवून दिले. यासाठी ही संघटना काढली असून आपण 4 तालुके एकत्र येत लढा उभारूया असे त्यांनी नागरिकांना आवाहनपर नम्र विनंती केली आहे.
या सभेला उपस्थित संजय तटकरे, श्रीवर्धन यांनी हे मुद्दे अत्यंत महत्वाचे असून लोकांच्या आयुष्याशी निगडित आहेत. त्यामुळे आपण एकत्र येणे गरजेचे असून एकी निर्माण करत पाठिंबा दर्शवीला. यानंतर मुकेश पवार यांनी आपले विचार मांडले. बँकिंक क्षेत्रात 25 वर्षे काम करणारे मुकेश पवार यांनी मुद्देसूद भाषण करीत आपला पाठिंबा दर्शवीला आणि उद्योग धंदे गावी होणे आणि ट्रेन ट्रान्सपोर्ट कनेकटींविटी ही काळाची गरज आहे, असे सुचविले. हाच धागा पकडत सकलप कोंड ता. म्हसळा चे अध्यक्ष अमर वाजे यांनी आपले मनोगत प्रांजलपणे मांडले म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव तालुक्यात 350च्या वर गावे, वाड्या, वस्ती आहेत. मात्र गावे बंद आहेत. लोकल ट्रेन आणि MIDC झाल्यास याचा नक्कीच छोट्या-मोठ्या उद्योगावर परिणाम होईल म्हणून हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि ते व्हायला पाहिजेत. यावेळी जांभूळचे मधुकर रिकामे यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले. ते गेली 25 वर्षे पनवेल मध्ये राहत आहेत. आपली माणगांव लोकल ट्रेन हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो आपला हक्क मिळालाच पाहिजे. त्यासाठी आपण गावोगावी जाऊन लोकांना सहकार्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. याचा थेट परिणाम रोजगारवार होईल. राजेश पवार हे आपल्या मनोगतांमध्ये आपण घेतलेलं हे काम लाख मोलाचे असून ते व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू असे उदगोषन करून आपले पूर्ण सहकार्य लाभेल असे सांगितले. यावेळी उद्योगपती राज पवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले ते नेहा टूल्स नावाचा व्यवसाय करतात. गावी MIDC असणे महत्वाचे आहे. मी सोलापूर MIDC मध्ये फॅक्टरी टाकून बसलो आहे. जर म्हसळा किंवा माणगाव मध्ये MIDC झाली तर गावीच फॅक्टरी टाकता आली असती. त्यामुळे स्थानिकांना रोजगारं मिळेल. मात्र MIDC नसल्यामुळे याठिकाणी आपण मागे आहोत याची खंत त्यांनी व्यक्त केली. सगळ्यात शेवटी एकनाथ लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीवर्धन तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक अशी त्याची ओळख आहे. गेली 30 वर्ष झाली MIDC नाही कि ट्रेन लोकल नाही यामुळे आपला तालुका मागे राहिला आहे आणि यासाठी केलेली ही एकजूट अशीच राहिली पाहिजे तरुणांनी एकत्र येत आपले प्रॉब्लेम आपणच सोडविले पाहिजेत असा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.
Comments
Post a Comment