पुष्प विनायक कॉम्प्लेक्स आदई येथे ध्वजा रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा...
पुष्प विनायक कॉम्प्लेक्स आदई येथे ध्वजा रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा...
पनवेल / जयेंद्र पवार
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी पुष्प विनायक कॉम्प्लेक्स सहकारी गृहसंथा आदई नवीन पनवेल येथे सोसायटी मधे 79 वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सोसायटीमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्रदिन साजरा केल्यानींमित्ताने कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून खांदेश्वर पोलिस स्टेशन एपीआय खैरनार साहेब आले होते. त्यांच्या शुभहस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पद्माकर शेळके. सेक्रेटरी विकास कदम, खजिनदार सीमा कडवे, संजय पवार, हरि विजय राऊत, विशाल देशमुख, ज्ञानदेव टेंबुलकर, सुशांत परशुराम, रुपेश घाणेकर, प्रफुल सागवेकर,आदिती गायकवाड, जयेंद्र पवार, राकेश यादव. योगेश आमराळे व सोसायटीती पोलीस अधिकारी परांडे बापू यांचीही उपस्थिती महत्वाची लाभली. सकाळी ९.३० वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी कार्यक्रमाला सोसायटी मधील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ध्वजरोहन झाल्यानंतर प्रभातफेरी अगदी उत्साहात पार पडली. सोसायटीतील लहान मुले, जेष्ठ व महिलानीही हिरहिरीने भाग घेतला. उपस्थितीतानी समूह गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सोसायटीतील जेष्ठ नागरिक व महिला सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. अशाप्रकारे प्रचंड उत्साहात 79 वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे, सुत्र संचालन करणारे संजय पवार यांनी केले.
Comments
Post a Comment