कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये सामाजिक कार्यक्रम
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये सामाजिक कार्यक्रम
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या खारघरचा राजा मंडळाने आयोजित केलेल्या 'महाराणी पैठणीची' या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजाची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराणी पैठणीची हा कार्यक्रम खारघर सेक्टर ५ येथील आई माता मंदिरात आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना महाराणी पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व महिलांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, दीपक शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस संध्या शारबिद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment