उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच फेऱ्या वाढणार...

 


उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच फेऱ्या वाढणार...


पनवेल (प्रतिनिधी) उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेऱ्यांऐवजी 50 फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकरच अंमलबजावणी होणार आहे . यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर, सोयीस्कर आणि वेळेवर होणार आहे.

     या बैठकीत केवळ रेल्वेमार्ग, फेऱ्या वाढविण्याबाबतच नव्हे, तर प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत. उरण-नेरूळ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नेहमीप्रमाणेच मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळणार असून रेल्वे सेवेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर