जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा - लोकनेते रामशेठ ठाकूर

 


जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा - लोकनेते रामशेठ ठाकूर 

पनवेल (प्रतिनिधी) जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही समाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल संस्थेचे तसेच तिच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन केले.

तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजीत करण्यात येणाऱ्या स्पर्धा ह्या एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. गेल्या १० वर्षांपासून संस्था हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. त्यामुळे संस्थेने यापुढेही असेच उपक्रम सुरू ठेवून त्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार व्हावेत असे प्रपितादन केले तसेच माझ्या वाढदिवसाचे औचित्यसाधून या स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले.

पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पनवेलमध्ये आमदार चषक भव्य बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. लोकनेत रामशेठ ठाकूर यांनी यावेळी कॉरम आणि बुद्धीबळ खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले. या स्पर्धेच्या उद्घटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस व स्पर्धाआयोजक नितीन पाटील, दि.बा. पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, सुनिल बहिरा, प्रभाकर बहिरा, प्रदीप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, निता माळी, प्रिती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, हेमलता म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, उपाध्यक्ष व आयोजक प्रीतम म्हात्रे, केदार भगत, सरचिटणीस अमित ओझे, उमेश इनामदार, लिना पाटील, सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी जाणिव एक सामजिक संस्था विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूंना आपले कौशल्या दाखवण्यासाठी एक व्यसपिठ उपलब्ध करुन देते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजीत केली असून या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर