प्रा. तुषार उमासरे यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. – तालुक्याचा अभिमान
म्हसळा (प्रतिनिधी शिरीष समेळ)
ता २० /०९/२०२५
महाड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा ठरावा असे यश प्रा. तुषार सविता शिवाजी उमासरे यांनी मिळवले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.त्यांनी “_सिंथेसिस, कॅरेक्टराझेशन ऍड बायलोजिकल स्टडिज ऑफ सम मेटल कॉम्प्लेसेस विथ नाॅव्हेल शिफ बेसेस ऑफ ऑसिनॅफ्थ्यॅक्किनोन” या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. संजय के पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रबंधात त्यांनी “ संयुगांची निर्मिती”, “नवीन उत्प्रेरकांचा वापर”या विषयांचा अभ्यास करण्यात आलाआहे.
प्रा. तुषार उमासरे हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रहीवाशी त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ,महाड तर पदव्युत्तर शिक्षण दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स काॅलेज येथे झाले असून,सध्या कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित आणि कै.ए.आर.अंतुले संस्थापित वसंतराव नाईक कला, वाणिज्य व बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालय, म्हसळा जिल्हा-रायगड येथे रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी २०१४ व २०१७ मध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली NET आणि SET परीक्षा,२०१८ मध्ये संशोधन क्षेत्रातील NET JRF परीक्षा उत्तीर्ण झाले असून २०२३ मध्ये RUSA अंतर्गत सुमारे एक लाख रूपये अनुदानाचा राष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकल्प देखील त्यांनी पुर्ण केलेला आहे.तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय,राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
प्रा.उमासरे यांच्या यशा बद्दल महाड येथील एम.एम.जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंजय धनावडे तसेच महाड येथील नवेनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते मंगेश हेंद्रे,अमोल रक्ते महेश शेंडगे , शब्बीर शेख, अभिजित कदम, युवराज रक्ते, हर्षल चिविलकर,तसेच प्रा.उमासरे यांचे नातेवाईक, मित्र -मैत्रिणी , विविध सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हे यश तालुक्यातील तरुण संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे अशी सर्व जणांनी भावना व्यक्त केली.
Comments
Post a Comment