# उद्योगपती अभिषेक दाजी विचारे यांना पांगलोली जिल्हा परिषद गटातून जनतेचा जाहीर पाठिम्बा... # राष्ट्रवादी पक्षाने उतरवलेला अभिषेक विचारे नावाचा भक्कम खिलाडी म्हसळा पांगलोली गटातून जिल्हापरिषद जिंकणार
# उद्योगपती अभिषेक दाजी विचारे यांना पांगलोली जिल्हा परिषद गटातून जनतेचा जाहीर पाठिम्बा...
# राष्ट्रवादी पक्षाने उतरवलेला अभिषेक विचारे नावाचा भक्कम खिलाडी म्हसळा पांगलोली गटातून जिल्हापरिषद जिंकणार.
म्हसळा - जितेंद्र नटे@रायगड मत
raigadmat.page
म्हसळा तालुक्यात सद्या "थंडी जरी गुलाबी पडत असली, तरी राजकीय गर्मी मात्र वाढली आहे." प्रत्येक पक्ष अगदी चोखून - चाचपून उमेद्वार मैदानात उतरवीत आहेत. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत येथे पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडून पांगलोली जिल्हा परिषद गटातून म्हसळ्याचे उद्योगपती फलसप गावचे स्थानिक भूमिपुत्र दाजी विचारे साहेब यांचे पुत्र अभिषेक दाजी विचारे यांना राष्ट्रवादीने तिकीट देऊन विजयाची जणू सलामीच दिली आहे.
विचारे यांचे सर्व समाजाप्रती चांगले व मोठे काम आहे. त्यामुळे म्हसळ्यातील मतदार त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असा पक्षाला विश्वास आहे.
आमदार अदितीजी तटकरे यांचे गावागावत केलेली विकास कामे, सतत जनतेमध्ये ठेवलेला जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादी पक्षाचीच सद्या जोरदार हवा आहे. खासदार सुनिलजी तटकरे साहेब आणि आमदार आदितीजी तटकरे यांची विकासकामे एवढी आहेत कि विरोधकांकडे त्यांच्या विरोधात बोलण्याला काही शिल्लकच नाही.
येणाऱ्या काळात म्हसळा-श्रीवर्धन मध्ये कोस्टल रोड, अदानी यांनी घेतलेला दिघे जेटी बंदर विस्तार, रस्ते रुंदीकरण यामुळे नोकऱ्या आणि व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे. तसेच टुरिस्ट - पर्यटन व्यवसाय जोमाने वाढत आहे. हरिहरेश्वर ते रत्नागिरी जोडणारा पूल रस्ता, श्रीवर्धन जीवना बंदरात प्रवासी जहाज थांबा, म्हसळा - गोंडघर खाणलोशी येथील होणारी MIDC अशा अनेक गोष्टीवर आमदार व कॅबिनेट मंत्री आदितीजी तटकरे आणि खासदार सुनिलजी तटकरे हे केंद्राची मदत घेऊन फास्ट काम करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात म्हसळा- श्रीवर्धनचा जबरदस्त काया पालट झालेला दिसेल. म्हसळ्याची जनता राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
राष्टवादीचे अभिषेक विचारे यांचे प्रभावी विचार जनतेला नक्की आवडतील आणि जनता त्यांना विजयी करणार अशी जोरदार चर्चा सद्या म्हसळ्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/DTy_oFgCMtf/?igsh=djJjd2llcGUwNm5n
Instagram follow करा पहा video

Comments
Post a Comment