भाजपातर्फे जॉब इंटरव्यूचे यशस्वी आयोजन," प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने तरुणांना मिळाला रोजगार"

भाजपातर्फे जॉब इंटरव्यूचे यशस्वी आयोजन," प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने तरुणांना मिळाला रोजगार" पनवेल : पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. त्या तरुणांना मिळण्यासाठी एक पाऊल म्हणून 29 जून रोजी भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्यूचे आयोजन केले होते. यावेळी बायकर, बॅक ऑफिस, ऑपरेशन स्टाफ, पिकर पॅकर, फिल्ड ऑडिटर, डिलिव्हरी एक्झिक्यूटिव्ह, सपोर्ट स्टाफ, व्हॅन बॉय, काउंटर स्टाफ इन्स्टॉलर /हेल्पर, फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्यू घेण्यात आले. यावेळी 500 पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती. यावेळी तरुणांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार मुलाखत घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी देण्यात आल्या. आमदार श्री.प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री. जे एम म्हात्रे साहेब यांची उपस्थिती होती. पनवेल शहरातील भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्...